डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडीवर (Dombivli Traffic) नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीसांनी एक उपाय समोर आणला आहे. रस्त्यावरील संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. आता तेच कॅमेऱ्यांची खातरजमा करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना प्रथम समज दिली जाणार. त्यानंतरही वाहन चालकाने दुर्लक्ष केले तर त्याला इ चनलातून दंड आकाराला जातो. अशी सिस्टम डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळ सुरू करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Rule Change : देशात 1 सप्टेंबर पासून होणार ‘हे 11’ मोठे बदल)
पश्चिमेला लावण्यात आलेल्या स्मार्टसीटी कंट्रोल रूम मध्ये अशी सिस्टीम लावण्यात आली आहे. यात एक वाहतूक (Dombivli Traffic) महिला सिस्टमसमोर बसून डोंबिवली पश्चिमेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आधी समज दिली जाते. स्मार्ट सिटीच्या कार्यालयातून या सिस्टमद्वारे हा आवाज थेट त्या वाहनचालकाला ऐकू येतो. आवाज ऐकूनही त्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन केले तर मात्र त्या वाहनाचा फोटोद्वारे त्या वाहनचालकाला इ चलन दंड आकारला जातो अशी माहिती डोंबिवली वाहतूक पोलीस (Dombivli Traffic) निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
या सिस्टमनूसार ६ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत (Dombivli Traffic) डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ही कारवाई सुरू आहे. डोंबिवली वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोर पालन करावे. स्टेशन परिसर वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community