केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवासाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्यांसाठी विमान प्रवास स्वस्त होणार आहे. कोविड काळात केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवर घालून दिलेले निर्बंध केंद्र सरकारने आता काढून टाकले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना तब्बल 27 महिन्यांनंतर विमानाचे तिकीट दर ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळणार असून, ते प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीटं देऊ शकतात. त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
केंद्र सरकारची घोषणा
कोविड काळात भारतीय विमान कंपन्यांना 40 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या देशांतर्गत उड्डाणांसाठी जीएसटी वगळून 2 हजार 900 रुपयांपेक्षा कमी आणि आणि 8 हजार 800 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारण्याची परवानगी नव्हती. पण ही बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. विमान भाड्याची कॅप काढून टाकण्याचा निर्णय याद्वारी घेण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत विमान सेवेला गती मिळून उड्डाणांची संख्या वाढेल, अशी आशाही सिंधिया यांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः ऑगस्टमध्ये 1,43,612 कोटी GST महसूल संकलित, गेल्या वर्षींच्या तुलनेत यंदा 24 टक्क्यांनी वाढ)
गेल्या काही दिवसांत विमान इंधनाच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे सरकारने विमान भाडे मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 ऑगस्ट रोजी दिल्लीत एटीएफच्या किंमतीत 12 टक्क्यांनी घट केली होती. यानंतर त्याची किंमत 1.21 लाख रुपये प्रति किलोलिटर झाली होती.
Join Our WhatsApp Community