1 मार्चपासून ‘या’ पाच नियमांमध्ये होणार बदल; जाणून घ्या सविस्तर

140

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 1 मार्चपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. 1 मार्च म्हणजे आजपासून आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर, सीएनजी, पीएनजी दरात वाढ झाली आहे. रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. ट्वीटर, फेसुबक, युट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

RBI ने यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर अनेक बॅंकांनी त्यांचे एमसीएलआर दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एमसीएलआरच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. आता लोकांना बॅंकांना ईएमआय देताना जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.

( हेही वाचा: महागाईचा आणखी एक फटका; LPG सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ )

CNG, PNG दरांत वाढ

LPG, CNG आणि PNG चे दर प्रत्येक महिन्याला बदलत असतात. गेल्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. मात्र, या महिन्यात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ट्रेनच्या वेळेत होणार बदल

फेब्रुवारी महिना सरत असताना आता उन्हाळा सुरु झाला आहे. मार्चमध्ये रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. 5 हजार मालगाडी आणि प्रवाशी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

सोशल मीडियामध्ये होणार बदल

मार्च महिन्यात सोशल मीडिया वापरणा-यांसाठी काही बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने अलिकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्वीटर, फेसबूक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म्सना आता भारतात नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.