Domestic gas : घरगुती गॅसच्या दरात साडेसहा टक्क्यांनी वाढ, पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता

125
Domestic gas : घरगुती गॅसच्या दरात साडेसहा टक्क्यांनी वाढ, पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता
Domestic gas : घरगुती गॅसच्या दरात साडेसहा टक्क्यांनी वाढ, पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. बाजारात टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ झाली, भाज्यांचे दर वाढले आहेत. त्याता आता पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

घरगुती नैसर्गिक ( Domestic gas) वायूचे दर ६.५ टक्क्यांनी वाढवले आहेत. सप्टेंबरमध्ये प्रति मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (MMBTU)चा दर ७१५ रुपये होता, तो आता ऑक्टोबरसाठी ७६५ रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी (CNG) आणि (PNG) गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

(हेही वाचा – LPG Commercial Gas Cylinders : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरच्या किमतींत लक्षणीय वाढ )

सरकारने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी एका नोटिफिकेशनद्वारे ही माहिती दिली. हे नवीन दर १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान लागू असणार आहेत. याआधी सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक वायूच्या किमतीत ७.८५ डॉलरहून ८.६० डॉलर इतके दर करण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून सलग नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली ही सलग दुसरी वाढ आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याचे म्हटले आहे. सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याने सलग दुसऱ्या महिन्यात दरवाढ केल्याचे निश्चित झाले आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे गॅस वितरण कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. याचा भार ग्राहकांवर पडणार आहे.

आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारवार दरनिश्चिती
रशिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि कतार या देशांकडून भारत नैसर्गिक वायू खरेदी करतो. हे देश ओएनजीसीला द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करतात. तिथून देशभरात नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. सरकारने नैसर्गिक वायूचे दर मासिक आधारावर ठरवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर सहा महिन्यांसाठी किंमत निश्चित केली जात होती, पण ऑक्टोबर २०२२ मध्ये नियम बदलण्यात आले आणि मासिक आधारावर दरनिश्चिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.