अमेरिकेचे माजी राष्ट्रपती (Former US President) डोनाल्ड ट्रम्प यांनी जिहादच्या विरोधात मोठे विधान केले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास जिहादी (jihadi in us) देश सोडून पळून जातील, असे विधान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केले आहे.
(हेही वाचा – Pre-Primary Primary School Timing : पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा सकाळी ९ नंतर सुरु होणार, शिक्षण मंत्र्यांचे संकेत)
मी जिंकताच मोठा बदल होईल
2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीच्या प्रेसिडेंशिअल प्रायमरीमध्ये (presidential primaries 2024) डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. याविषयी ते म्हणाले की, ”जर मी दुसऱ्यांदा राष्ट्रपती (President) झालो, तर बरेच लोक देश सोडून जातील. मी जिंकताच मोठा बदल होईल. बरेच लोक देश सोडून पळून जाणार आहेत. पुन्हा एकदा जिहादी देशांवर बंदी आणली जाईल आणि त्यांच्या प्रवासावरही बंदी घातली जाईल, हे त्यांना समजेल.”
तर तुम्ही आमच्या देशात घुसू शकणार नाही…
राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल. जर आपण अमेरिकेचा द्वेष करत असाल. जर आपण इस्रायलला (israel hamas war) नष्ट करण्याचा विचार करत असाल, जर आपली सहानुभूती जिहाद्यांसोबत असेल, तर तुम्ही आमच्या देशात घुसू शकणार नाहीत. आम्हाला तुमची आवश्यकता नाही. महत्त्वाचे म्हणजे, जर ज्यो बायडेन राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले, तर आपण देश सोडून जाऊ, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये आक रॅलीदरम्यान म्हटले होते.
(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊदच्या वृत्ताने गुन्हेगारी विश्वात खळबळ, दाऊदचे मुंबईतील नातलग मात्र चिडीचूप)
ट्रम्प यांनी 2017 मध्ये केले होते ट्रॅव्हल बॅन
अमेरिकेने लिबिया (Libya), इराण (Iran), सोमालिया (Somalia), सीरिया (Syria), येमेन (Yemen) आणि अधिक मुस्लिम लोकसंख्या (muslim countries) असलेल्या सर्व देशांतील लोकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घातली होती. याशिवाय उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएलावरही बंदी घालण्यात आली होती. यानंतर 2020 मध्ये म्यानमार, किर्गिस्तान, नायजेरिया, टांझानिया, सुदानवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र बायडेन यांचे सरकार आल्यानंतर, ही प्रवासी बंदी उठवण्यात आली.
आता पुन्हा जिहादचा मुद्दा घेऊन डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community