Donation to Ram Mandir : अयोध्येतील श्रीराममंदिराला आतापर्यंत मिळाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे दान

Donation to Ram Mandir : मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ हजार २०० कोटी रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत. 

313
Donation to Ram Mandir : अयोध्येतील श्रीराममंदिराला आतापर्यंत मिळाले 'इतक्या' कोटी रुपयांचे दान
Donation to Ram Mandir : अयोध्येतील श्रीराममंदिराला आतापर्यंत मिळाले 'इतक्या' कोटी रुपयांचे दान

५०० वर्षांनंतर उभारण्यात येत असलेल्या राममंदिराला देश-विदेशातून अनेक भाविक देणग्या देत आहेत. (Donation to Ram Mandir) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ हजार २०० कोटी रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास)

व्याजातूनच झाले मंदिराचे बांधकाम

राममंदिर ट्रस्टने देशातील ११ कोटी लोकांकडून ९०० कोटी रुपये उभे करण्याचे ध्येय ठेवले होते. डिसेंबर २०२३ पर्यंत ५ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत १८ कोटी रामभक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या खात्यांमध्ये अनुमाने ३ हजार २०० कोटी रुपयांचा समर्पण निधी जमा केला आहे. ट्रस्टने या बँक खात्यांमध्ये दान केलेल्या पैशांची ‘एफ्.डी’ (मुदत ठेव) केली होती, ज्यावरील व्याजामध्येच मंदिराचे आतापर्यंतचे बांधकाम झाले आहे.

कोणी दिली किती देणगी ?

आध्यात्मिक गुरु आणि कथाकार मोरारी बापू (Morari Bapu) यांनी आतापर्यंत सर्वाधिक देणगी दिली आहे. मोरारी बापूंनी राममंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या व्यतिरिक्त, US, कॅनडा आणि युनायटेड किंग्डममधील त्यांच्या अनुयायांनी एकत्रितपणे 8 कोटी रुपये दिले आहेत. त्याच वेळी गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंदभाई ढोलकिया हे हिरे कंपनी श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक आहेत.

(हेही वाचा – National Sports Awards 2023 : मोहम्मद शमी, शीतल देवी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान)

अयोध्येतील (Ayodhya) राममंदिराच्या (Ram Mandir) उभारणीसाठी देणग्या गोळा करण्याची मोहीम तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 14 जानेवारी 2021 रोजी सुरु केली होती. रामनाथ कोविंद यांनी राम मंदिरासाठी सर्वप्रथम ५ लाख रुपयांचा चेक दान केला होता. (Donation to Ram Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.