मुंबईतील गणेशोत्सव (Lalbaugcha Raja) हा अगदी विशेष असतो. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी परदेशातूनही माणसं येत असतात. विशेष म्हणजे लालबाग, गिरगाव यांसारख्या भागातील गणेशोत्सव हा अगदी दणक्यात साजरा केला जातो.
अशातच संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाने (Lalbaugcha Raja) दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आता भक्तांचा निरोप घेतला आहे. शुक्रवार २९ सप्टेंबर सकाळी नऊ वाजेनंतर लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला. राजाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांची तोबा गर्दी होती. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन देऊन बाप्पाने आपल्या लाडक्या भाविकांचा निरोप घेतला आहे.
त्यानंतर आता लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) आलेल्या दानाचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी देखील राजाच्या दानपेटीत भक्तांनी भरभरून दान केलं आहे. दानामध्ये आलेली एकूण रोख रक्कम ही कोटींच्या घरात असून, तब्बल साडे तीन किलो सोनं आणि ६४ किलो चांदी दानात मिळाली आहे.
(हेही वाचा – Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील टीकेप्रकरणी कोर्टाने बजावली नोटीस ; राहुल गांधींच्या अडचणी वाढणार)
अधिक माहितीनुसार राजाच्या पहिल्या दिवशीच्या दर्शनताच (Lalbaugcha Raja) दानपेटीमध्ये ४२ लाख रोख तर १९८.५५० ग्रॅम सोने आणि ५४४० ग्रॅम चांदीच्या वस्तू दान करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दानपेटीत ६०,६२,००० रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी १८३.४८० ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आलं आहे. तसेच ६,२२२ ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली आहे.
कोळी बांधवांकडून राजाला सलामी
विसर्जनाच्या वेळी दरवर्षीप्रमाणे कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी पाहायला मिळाल्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त (Lalbaugcha Raja) पाहायला मिळाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community