Dongri laxmi Building : डोंगरीतील त्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने पाच वेळा केली होती कारवाई

786
Dongri laxmi Building : डोंगरीतील त्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने पाच वेळा केली होती कारवाई
Dongri laxmi Building : डोंगरीतील त्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने पाच वेळा केली होती कारवाई

डोंगरी येथील म्हाडाच्या उपकर प्राप्त लक्ष्मी इमारतीतील (Dongri laxmi Building ) वाढीव अनधिकृत मजले (Unauthorized construction) आणि त्यातील घुसखोरांसंदर्भात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आरोप केल्यानंतर, महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाने या इमारतीतील पाणी आणि वीज तोडण्याचे  निर्देश संबंधित  विभागांना दिले आहेत. विशेष म्हणजे सन २०१८मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरु असताना अनधिकृत बांधकामांच्या (Unauthorized construction) तक्रारीनुसार महापालिका बी (bmc b ward) विभागाच्यावतीने इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर मार्च २०१८ पासून पाच वेळा काम थांबवण्याची नोटीस जारी करून पाच वेळा येथील अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) तोडले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सन कोविडनंतरच या इमारतीचे बांधकाम झाल्याचे उघड होत आहे. (Dongri laxmi Building)

(हेही वाचा- Sea View Beach Resort निवडण्याची ही आहेत ५ कारणे)

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी डोंगरी भागातील हिंदु कुटुंबाच्या चार मजली लक्ष्मी इमारतीत घुसखोरी करून वरील ९ मजले अनधिकृत बांधले (Unauthorized construction) असल्याचे सांगत या बांगलादेशी घुसखोरी विरोधात राणे (Nitesh Rane) यांनी पोलिस आणि महापालिका (Municipal Corporation) अधिकाऱ्यांसह भेट देऊन त्वरीत कारवाई करण्याची मागणी  डोंगरी येथील  (Dongri laxmi Building )नरशी नाथा चौक येथील सभेत आरोप केले होते. राणे यांनी न्यायालयाचे बांधकाम पाडायचे आदेश असताना वरील अनधिकृत मजल्यांसह इमारत उभी आहे. या इमारतीत राहणारे बांगलादेशी यांचे कोणतेही रेकॉर्ड प्रशासनाकडे नाहीत. देशविघातक शक्ती घेऊन अशा इमारतीत राहून कायदा सुव्यवस्था बिघडवू शकतात,असे महापालिका (Municipal Corporation) प्रशासन आणि पोलिस यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार महापालिका उपायुक्त परिमंडळ ०१च्या डॉ संगीता हसनाळे यांच्याकडे या संदर्भात संबंधित अधिकारी व मुळ भाडेकरू यांची बैठक पार पडली. (Dongri laxmi Building )

इमारतीच्या बांधकामाला एप्रिल २०१६मध्ये परवानगी

या संदर्भात महापालिकेच्या (Municipal Corporation) बैठकीचे इतिवृत्तात जारी झाले असून या इतिवृत्ताची प्रत नितेश राणे (Nitesh Rane) यांना प्राप्त झाली आहे. त्यामध्ये ही इमारत उपकर प्राप्त असून इमारतीचे मालक व रहिवाश्यांना इमारत मोडकळीस आल्याने च्या दुरुस्तीकरिता (विना परतावा) ना हरकत प्रमाणपत्र  हे  म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे उप. मुख्य अभियंता  २३ एप्रिल  २०१६ अन्वये रहिवाश्यांनी नेमणूक केलेल्या वास्तूशास्त्रज्ञ  सुप्रीम कन्सल्टंट यांस अटी व शर्ती पूर्ततेसापेक्ष वितरित केले होते. (Dongri laxmi Building)

म्हाडाने महापालिकेला  मार्च २०१८ कळवले अनधिकृत बांधकाम संदर्भात

त्यानंतर या वास्तूशास्त्रज्ञ व कंत्राटदार यांनी ना हरकत प्रमाणपत्रातील कलम क्र.११ चे अनुपालन न करता मुंबई महानगरपालिके (Municipal Corporation) कडून कोणतीही  आयओडी  व सीसी प्राप्त न करता ही इमारत पाडून या इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले होते. त्यामुळे म्हाडा कार्यालयामार्फत हे बांधकाम थांबविण्यासाठी  २० मार्च २०१८ वास्तूशास्त्रज्ञ व कंत्राटदाराला  कळविले होते,अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्यानंतर म्हाडा मार्फत  २६ मार्च २०१८ रोजी मुंबई महानगरपालिकेला (Municipal Corporation) अनधिकृत बांधकामाबाबत (Unauthorized construction) माहिती दिली व योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले होते,अशी माहिती समोर आले  आहे. (Dongri laxmi Building )

(हेही वाचा- Ajit Pawar यांनी काका आणि बहिणीला बारामतीतच का गुंतवले ?)

जलजोडणी तोडण्याची कार्यवाही

 नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या आरोपांनंतर या ठिकाणी असलेले रहिवाशी तथा भाडेकरू हे मुळ बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातील असल्याचे, त्यांच्या आधारकार्ड वरुन त्यांची कौटंबिक माहिती तपासण्यात आलेली असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या इमारतीतील अनधिकृत पाण्याचे कनेक्शन कापण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून या इमारतीचे वीज पुरवठा करिता ८ मीटर चालू असून सन २०२२ मध्ये एकूण १० अनधिकृत जोडणीधारकांवर कारवाई करण्यात होती असे बेस्टने नमुद केले आहे. (Dongri laxmi Building )

 एप्रिल २०१८मध्ये मालक,कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

 ही इमारत उपकर प्राप्त अर्थात सेस  असुन तळ अधिक ५ मजली होती. इमारत दुरुस्तीसापेक्ष पुनर्बाधणीचे काम चालू झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर महापालिकेने (Municipal Corporation) ३५४ अन्वये मार्च ते मे २०१८ या कालावधीत  पाच वेळा नोटीस जारी करून  काम थांबवण्याचे निर्देश दिले होते. तसेच  २१ मार्च पासून ९ मे २०१८ पर्यंत याबाबतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचेही  महापालिका बी विभागाच्या (bmc b ward) सहायक अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इमारतीच्या मालकावर व कंत्राटदारावर ,एमआरटीपी अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये प्रथम २ एप्रिल २०१८ रोजी एफआयआर नोंदवण्यात आले होते. तसेच सद्यस्थितीत उच्च न्यायालयात या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. (Dongri laxmi Building )

इमारतीचे मुळ भाडेकरु मदन रेड्डी यांनी इमारतीच्या मालकावर रहिवाश्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा नोंदविण्याची व या इमारती मध्ये अनधिकृत वीज व पाणी जोडणी खंडित करण्याबाबतचे निर्देश परिमंडळ उपायुक्तांनी दिल्याची माहिती या इतिवृत्ताद्वारे समोर आली आहे. (Dongri laxmi Building )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.