कोरोनाच्या (Corona) अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार मास्क वापरा, वारंवार हात साबणाने धुवा, दोघा व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर असावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा आणि चुकीची माहिती इतरांना देऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आरोग्य विभागाने (Health Department) स्पष्ट केले आहे. (Corona JN-1 Virus)
(हेही वाचा – Ayodhya Pran Pratishtha : मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; जाणून घ्या कारण…)
ओमायक्रॉच्या (Omicron) ‘जेएन-वन’ (JN-1 Virus) व्हायरसमुळे सध्या भितीचे वातावरण आहे. पण सर्वांनी खबरदारी घेतल्यास घाबरण्यासारखे काहीच नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पण, नागरिकांनी संशय वाटल्यास कोरोनासंबंधीची (Corona) चाचणी स्वत:हून करून घ्यावी. आरोग्य विभागाच्या माध्यमातून (Health Department) सर्वेक्षण सुरूच असून आजारी रूग्णांवर तातडीने उपचार देखील केले जात आहेत. नागरिकांना काहीही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी १०४ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन पुणे जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी केले आहे. (Corona JN-1 Virus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community