Narendra Modi: अमली पदार्थांचे सेवन करू नका, आई-वडिलांचा आदर करा; पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधून दिले मोलाचे सल्ले

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी भारताच्या युवा पिढीसाठी हा काळ चांगला असल्याचं सांगत काही मोलाचे सल्लेही दिले.

145
Narendra Modi: अमली पदार्थांचे सेवन करू नका, आई-वडिलांचा आदर करा; पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधून दिले मोलाचे सल्ले
Narendra Modi: अमली पदार्थांचे सेवन करू नका, आई-वडिलांचा आदर करा; पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधून दिले मोलाचे सल्ले

भारताच्या युवा पिढीसाठी काळ चांगला आहे. तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करू नये. नशेपासून दूर राहावे. माता-बहिणींवरून शिव्या देऊ नये, आपल्या आई-वडिलांचा आदर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी, (१२ जानेवारी) देशातील तरुणांशी संवाद साधून त्यांना महत्त्वाचे सल्ले दिले. नाशिक येथील २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त ते बोलत होते.

मंदिर परिसरात मोदींनी केली स्वच्छता…
यावेळी प्रथम पंतप्रधान मोदींच्या आगमनानिमित्त रोड शो झाला. त्यांनंतर नाशिककरांचं अभिवादन स्वीकारून ते गोदाकाठी रामकुंडावर दाखल झाले. तिथे जलपूजन करून त्यांनी काळाराम मंदिरात प्रभु श्रीरामाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तरुणांना संदेश देण्याआधी त्यांनी मंदिराचे आवारातील काही परिसर पाणी आणि मॉपच्या सहाय्याने पुसून मंदिर सेवाही केली. यावर मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव)

त्यानंतर ते सभास्थळी पोहोचले आणि त्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी भारताच्या युवा पिढीसाठी हा काळ चांगला असल्याचं सांगत काही मोलाचे सल्लेही दिले. नशेपासून लांब राहा; माता, बहिणींवरून शिव्या देऊ नका, असं आवाहन मोदींनी आपल्या भाषणादरम्यान केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी तरुणांशी साधलेला संवाद…

– माझं भाग्य आहे की, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला आज शुक्रवार, (12 जानेवारी) मी नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो.

– हा केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धरतीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारखी मातृशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नायकाला जन्म दिला. याच धरतीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरांसारखी महान नारीशक्ती देशाला दिली. याच धरतीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले.

– नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो, असे पंतप्रधान म्हणाले. २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिरांची साफसफाई करावी. मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं.

– मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा.

– आपल्या देशातील ऋषीमुनींपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी युवाशक्तीला सर्वतोपरी सहकार्य केलं आहे.

– आज हिंदुस्थान जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थेत दाखल झाला आहे. ही युवकांची ताकद आहे. आज आपला देश जगातील टॉप 3 इकोसिस्टिममध्ये आला आहे.
देशात एकापेक्षा जास्त इनोवेशन होत आहेत, अनेक पेटंट फाईल करत आहे, मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.

– आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीत आहोत. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महान व्यक्तिंनी देशासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी देशासाठी स्वत:चं आयुष्य वेचलं. या सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली.

– देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की, आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील.

– देशाची युवा पिढी तयार होत आहे. ही पिढी गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे.

– हिंदुस्थान ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात, तर घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल. परिवारवादाच्या राजकारणानं देशाचं नुकसान केलंय.

– युवक आपल्या लोकशाहीत ऊर्जा आणू शकतील. युवकांनी मतदार यादीत नाव आल्यानंतर देशासाठी मतदान करावं. देशाचा अमृतकाळ हा परिवर्तनकाळ आहे.

– तरुणांना काही सूत्रावर ध्यान ठेवावं लागेल ‘मेड इन इंडिया प्रोडक्ट वापरा’; कोणतीही नशा, ड्रग्जपासून लांब राहा. माता, बहिणी, मुलींना शिव्या देऊ नका, अपशब्द वापरू नका.

– देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने सशक्त आणि सक्षम हिंदुस्थानसाठी प्रयत्न करेल, हा मला विश्वास आहे.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.