HMPV Virus बद्दल अफवा पसरवू नका! तज्ज्ञांचे आवाहन

80
HMPV Virus बद्दल अफवा पसरवू नका! तज्ज्ञांचे आवाहन
HMPV Virus बद्दल अफवा पसरवू नका! तज्ज्ञांचे आवाहन

चीनमध्ये (China) पुन्हा एकदा एका नवीन विषाणूच्या उद्रेकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे जगभर लोकांच्या समस्या वाढत आहेत. चीनमध्ये पसरणाऱ्या या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही (HMPV Virus) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा विषाणू वृद्ध आणि लहान मुलांमध्ये वेगाने पसरत आहे. एचएमपीव्ही विषाणूचे (HMPV Virus) रुग्ण मुंबई व नागपूर येथे सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वीच आपल्याकडे आढळलेला आहे. या व्हायरसपेक्षा (HMPV Virus) सोशल मीडियावरील माहिती अधिक धोकादायक आहे. अशा अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आरोग्य विभागांना या विषाणूबाबत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे होणाऱ्या आजारात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. त्यावर उपचार उपलब्ध आहेत.

हेही वाचा-गाईला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी Mahakumbh मध्ये दररोज ९ तास होणार महायज्ञ

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे काही कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. यामुळे या आजाराबद्दल नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकल्यासंबंधित रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचना पुण्यातील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिल्या आहेत. (HMPV Virus)

हेही वाचा-Pakistani पुरुषांनी केले ब्रिटनमधील हजारो मुलींचे लैगिक शोषण; ‘ग्रुमिंग गँग’ विरोधात एलॉन मस्क आक्रमक

नागरिकांनी सतर्क राहून चुकीची माहिती पुढे फॉर्वड करू नये. या व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांची डॉक्टरांना माहिती आहे. हा कोरोनासारखा नवीन व्हायरस नाही. या आजारावर देशातील काही वैद्यकीय संस्थांनी यावर संशोधन पेपर मेडिकल जर्नलमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध केलेले आहेत. (HMPV Virus)

काय काळजी घ्याल? (HMPV Virus)
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.