Holi 2023: होळीसाठी झाडे कापण्याची हिंमत करू नका, नाहीतर जाल आत

146
होळी सणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये, अन्यथा अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांना दंड तसेच कैदेची शिक्षा होवू शकते, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी एक हजार रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंतचा दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
अनधिकृत वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘होळी’च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास अथवा तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम २१ अन्वये अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी हजार रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंतचा दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांस आणि स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असेही आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत  करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.