शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, राज्यातील राजकीय वातावरणात भुकंप आला आहे. नाराज एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन आधी गुजरातला पोहोचले, त्यानंतर ते सध्या गुवाहाटिला आहेत. त्यांच्या या बंडानंतर शिवसेनेचे अनेक नेते Not Reachable असल्याचे समोर आले आहे.
याच निमित्ताने लोक असे नाॅट रिचेबल का राहतात? किंवा नाॅट रिचेबल राहताना नको त्या लोकांचे काॅल्स कसे टाळावेत? ते जाणून घेऊया.
( हेही वाचा: NH8, NH13; असे क्रमांक राष्ट्रीय महामार्गांना का दिले जातात ? )
नाॅट रिचेबल राहण्याच्या काही ट्रिक्स
काॅल फाॅरवर्ड करण्याचा प्रयत्न करा
तुमचा काॅल तुमच्या कोणत्याही लॅंडलाइन नंबरवर फाॅरवर्ड करण्याची आणि रिसीव्हरला क्रॅडलमधून टाकण्याची सर्वात सोपी युक्ती म्हणजे काॅल फाॅरवर्डिंग. हे काॅलरला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास प्रतिबंधित करेल, कारण त्याला तुमचा मोबाइल नंबर कव्हरेज क्षेत्राबाहेर दाखवेल.
मिस्ड काॅल अलर्ट नंबर शोधा
तुमचा काॅल दुस-या नंबरवर फाॅरवर्ड करण्यासाठी, तुमच्या फोन ऑपरेटरचा मिस्ड काॅल अलर्ट नंबर शोधा.
नेटवर्क मोडमध्ये बदल करा
आजकाल सर्व स्मार्टफोन्समध्ये LTE मोड असतो. जो हाय-स्पीड नेटवर्क कनेक्टिव्हिटी निश्चित करतो. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 4G नेटवर्क नसेल, परंतु ते 4G/LTE ला सपोर्ट करणार असेल, तर मग फक्त तुमचा नेटवर्क मोड 4G/LTE वर ठेवा, तो तुमचा नंबर नाॅट रीचेबल करेल.
विशेष नंबर ब्लाॅक करा
काॅल नाॅट रिचेबल करण्यासाठी तुम्ही विशिष्ट नंबर ब्लाॅक करा. यासाठी तुम्ही अॅंड्राॅइड उपकरणांमध्ये इनबिल्ट काॅल ब्लाॅकिंग फीचर वापरु शकता.
सिम कार्ड किंवा बॅटरी काढून ठेवा
ही एक सोपी युक्ती आहे, परंतु ब-याच वेळा काम करते. एखादा नको असलेला फोन आल्यास सिमकार्ड किंवा फोनची बॅटरी फोन बंद न करता फक्त काढून टाका. यामुळे फोन रीबूट करेपर्यंत तुम्हाला कोणतेही फोन येणार नाहीत.
फ्लाइट मोड वापरा
तुमचा फोन फ्लाइट मोडवर सुरु ठेवा म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला फोन करेल तेव्हा त्याला/ तिला तुमचा फोन नाॅट रिचेबल येईल.
Join Our WhatsApp Community