UPI Transactions : …तर UPI व्यवहार नकोत ?; सर्व्हेक्षणातून समोर आली भारतियांची मानसिकता

194
UPI Transactions : ...तर UPI व्यवहार नकोत ?; सर्व्हेक्षणातून समोर आली भारतियांची मानसिकता
UPI Transactions : ...तर UPI व्यवहार नकोत ?; सर्व्हेक्षणातून समोर आली भारतियांची मानसिकता

सध्या भारतात डिजिटल व्यवहार सर्वांना परिचित झाले आहेत. जवळजवळ प्रत्येक जण युपीआयच्या मदतीने आर्थिक व्यवहार करतो. मात्र या व्यवहारावर शुल्क आकारणी केल्यास आम्ही ते बंद करू, असे अनेकांचे मत आहे. मात्र युपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारले गेले तर ते भरण्याची तयारी आहे का, असा प्रश्न विचारला गेला. त्या दरम्यान आता एका सर्वेक्षणानुसार यूपीआयने केलेल्या व्यवहारांवर शुक्ल आकारण्यास सुरुवात झाल्यास जवळपास 75 टक्के लोक युपीआयचा वापर बंद करतील, असे समोर आले आहे.

(हेही वाचा – Gujarat Crime: सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुख्याध्यापकाने केला अतिप्रसंग; नंतर केली तिची हत्या!)

लोकल सर्कल्स या संस्थेने हे सर्वेक्षण केलेले आहे. विशेष म्हणजे सर्वेक्षणातून समोर आलेला ही संस्था केंद्रीय अर्थमंत्रालय तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेला देणार आहे. यूपीआयच्या व्यवहारांवर कोणताही निर्णय घेण्याआधी लोकांचेही मत विचारात घ्यायला हवे, असे लोकल सर्कल्सचे मत आहे. हे सर्वेक्षण 15 जुलै ते 20 सप्टेंबर या काळात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता.

हे सर्वेक्षण 308 जिल्ह्यांत करण्यात आले आणि साधारण 42,000 युपीआय वापरकर्त्यांची मतं जाणून घेण्यात आली. त्यानुसार साधारण 38 टक्के वापरकर्ते आपले 50 टक्के व्यवहार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा अन्य प्रकारच्या माध्यमाचा वापर न करता फक्त युपीआयच्या माध्यमातून करतात.

या सर्वेक्षणानुसार फक्त 22 टक्क यूपीआय वापरकर्ते यूपीआयच्या मदतीने केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क देण्यास तयार आहेत. साधारण 75 टक्के लोक हे युपीआयच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क देण्यास तयार नाहीत. युपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुक्ल आकारले जात असेल तर आम्ही त्याचा वापर बंद करू, असे वापरकर्त्यांचे मत आहे.

व्यवहारांची संख्या 100 अब्जच्याही पुढे
यूपीआयवरील शुल्कासंबंधीच्या प्रश्नावर एकूण 15,598 उत्तरे आली. एनपीसीआयच्या मतानुसार 2023-24 साली याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यूपीआयच्या व्यवहारात 57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्यांदाच यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या ही एका आर्थिक वर्षात तब्बल 100 अब्जच्याही पुढे गेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.