1 जुलै रोजी 8 हजारांपेक्षा जास्त सरकारी कर्मचा-यांचे प्रमोशन करण्याची घोषणा केल्यानंतर त्यानंतर आता सरकारी कर्मचा-यांना आणखी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत सरकारी कर्मचा-यांच्या प्रमोशनच्या बाबतीत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचा-यांच्या पगारात देखील घरघोस वाढ होणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन
केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा गट-अ च्या अधिका-यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेत अधिका-यांच्या प्रलंबित प्रमोशनबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. अधिका-यांच्या या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या मागण्यांचा विचार सरकारकडून करण्यात येईल व प्रमोशनच्या बाबतीत निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्याचं आश्वासन जितेंद्र सिंह यांनी दिले आहे.
पदोन्नती गरजेचीच
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 1 जुलै 2022 रोजी एकाच वेळी तीन प्रमुख सचिवालय सेवांशी संबंधित 8 हजारांपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रमोशन दिले होते. सेवेत असताना पदोन्नतीशिवाय निवृत्त होणे हे सरकारी कर्मचा-यांसाठी निराशाजनक असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व पदोन्नती आता सुरळीत केल्या जातील, असा विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community