- ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरणाची बैठक ६ डिसेंबरला होणार आहे. पण, त्या आधी मध्यवर्ती बँकेनं काही महत्त्वाचे अहवाल जारी केले आहेत. त्यातील एक अहवाल असं सांगतो की, देशात निद्रिस्त (काही वर्षांत व्यवहार न झालेली खाती) खाती वाढत चालली आहेत आणि अशा खात्यांमध्ये १ लाख कोटी रुपये पडून आहेत. दोन कारणांसाठी ही काळजीची गोष्ट आहे. एकतर हा पैसे वापरावाचून पडून राहिलेला आहे आणि दुसरं म्हणजे अशा निद्रिस्त खात्यांवर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांची नजर पडू शकते आणि या खात्यांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. (Dormant Bank Accounts)
बँकांनीच आता निद्रिस्त खात्यांच्या बाबतीत पुढाकार घेऊन ती पुन्हा सुरू होतील यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मध्यवर्ती बँकेनं दिले आहेत. निद्रिस्त खात्यांमध्ये अडकलेल्या रकमेत दरवर्षी २८ टक्क्यांनी वाढ होत आहे. २०२३ पर्यंत भारतातील विविध बँकांमध्ये १ लाख कोटी रुपयांची रक्कम बेवारस पडून आहे आणि यातील ४२,००० कोटी रकमेवर कुणीही दावा केलेला नाही. (Dormant Bank Accounts)
(हेही वाचा – बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री : Eknath Shinde)
अलीकडेच मध्यवर्ती बँकेनं विविध बँकांना निद्रिस्त खात्यांवर लक्ष ठेवून त्याविषयीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यामध्ये घोटाळे आणि खोटी ओळख सिद्ध करण्यासाठी अशा बँक खात्यांचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. ‘अशा खात्यांचा वापर करून गैरप्रकार केले जाऊ शकतात. घोटाळे, अफरातफर अशा कामांसाठी सायबर भामटे अशाच प्रकारची खाती वापरत असतात. त्यामुळे निद्रिस्त खाते ही खातेधारकाची जबाबदारी असली पाहिजे,’ असं सायबर तज्ञ विक्रम बब्बर यांनी म्हटलं आहे. अशा खात्यांमधून मग पैसे देशाबाहेर हलवले जातात. (Dormant Bank Accounts)
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीमुळे भारताला ११,३३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत सुमारे २०% जन धन खाती निष्क्रिय होती. याचा अर्थ एकूण ५१ कोटी जनधन खात्यांपैकी १०.३ कोटी खाती निष्क्रिय होती. निद्रिस्त खात्यांमुळे हा पैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी तर वापरता येत नाहीच. शिवाय तो देशाबाहेर जाण्यासाठीही मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेत संपर्क करून खातं पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया पार पाडावी आणि खातं सुरू करावं अशी विनंती रिझर्व्ह बँकेनं केली आहे. (Dormant Bank Accounts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community