मुंबईत मागील काही दिवसात हिवताप (मलेरिया) आणि डेंगी (Dengue) या दोन्ही आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या तापाकडे दुर्लक्ष करू नये. ताप आल्यास महानगरपालिका दवाखाना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला भेट देऊन वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे. (Mumbai Dengue Malaria)
हिवताप (मलेरिया) आणि डेंगी (Dengue) या दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो. यापैकी हिवताप या आजाराचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंगीचा प्रसार ‘एडिस’ डासांमुळे होतो. अशा स्थितीत योग्य ती काळजी घेऊन व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर डासांची उत्पत्ती रोखली जाऊ शकते. पर्यायाने आजारांचा फैलाव होणार नाही. (Mumbai Dengue Malaria)
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून ही कामे निरंतर सुरू असतात. त्यासोबतच, या उपाययोजना प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्तरावरदेखील करणे गरजेचे आहे. कारण, डेंगी आजार (dengue disease) पसरवणाऱ्या एडिस डासांची उत्पत्ती घरात व घराच्या अवतीभोवती होत असल्याने या उपाययोजनांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. (Mumbai Dengue Malaria)
या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी हे करावे
• दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक (Mosquito Repellent) औषधांचा वापर करावा.
• कुलर, फ्रीज (डिफ्रॉस्ट ट्रे आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा. (Mumbai Dengue Malaria)
डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाका, यासह ही काळजी घ्यावी
• बाल्कनीत प्लॅट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे.
• धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक.
• कूलर, बाथरूम आणि टाक्यांमध्ये गळती.
• उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत.
• शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शोपीस.
• बोन्साई वनस्पती आणि इनडोअर वनस्पती.
• डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाजूचे कपडे घाला. (Mumbai Dengue Malaria)
(हेही वाचा – Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपा आली ॲक्शन मोड मध्ये)
आणि काय करू नये
• जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.
• डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे ड्रम, पाणी साठविण्याची भांडी इत्यादी बंद ठेवा.
जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड) खबरदारीचे उपाय
• गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा.
• खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा.
• पाणी उकळून प्यावे. (Mumbai Dengue Malaria)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community