पुणे, दिल्ली येथील एनआयबीच्या ज्या मोठ्या लॅब आहेत. ज्यांना लेव्हल ४ लॅब म्हणतात, त्या लॅबमध्ये देशातील कोरोना विषाणूच्या म्युटेशनवर संशोधन होत असते. तेथे विषाणूच्या जीन्सचे मॅपिंग होते. त्यानंतर कोरोनाच्या विषाणूची नवी ओळख उघड होत असते. म्हणून दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा स्ट्रेन अमरावतीमधला आहे, असे म्हणणे घाईचे होईल. त्यावर संशोधन करताना केवळ अमरावतीच्याच स्ट्रेनचा विचार होऊ नये, असे केईएम रुग्णालयाचे निवृत्त अधिष्ठाता आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना म्हणाले.
भारतात थैमान घालत असलेला कोरोनाचा नवा म्युटेंट हा ब्रिटेनमधून आला कि कुठून आला, हे ओळखणे कठीण आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाला डबल म्युटेंट अर्थात स्ट्रेन म्हणतात. तो मागील म्युटेंटपेक्षा वेगळा आहे. तो आपल्याकडे अमरावतीत तयार झाला असे आता म्हणणे कठीण आहे.
– डॉ. अविनाश सुपे, सदस्य, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स.
दुसरी लाट अमरावतीतून आली हे नक्की!
राज्यात दुसरी कोरोना लाट ही अमरावती, विदर्भ भागातून आली. त्यानंतर बुलढाणा, अकोला येथून पुढे राज्यात पसरली. पण आता यवतमाळ, अमरावती येथील कोरोना नियंत्रणात आला आहे. आता तो मुंबईदेखील वाढला आणि नियंत्रणात आला आहे. मात्र नांदेड, जालना, नाशिक अशा अन्य राज्यांत तो वाढत आहे. आता दिल्ली, गुजरातमध्ये तो वाढतो आहे. पहिल्या लाटेत कोरोना आधी केरळमध्ये आला होता, मग पुणे त्यानंतर मुंबईमध्ये वाढला होता. पुढे तो महाराष्ट्रात आणि नंतर इतर राज्यांमध्ये पसरला होता. दुसऱ्या लाटेतही आपण तोच पॅटर्न पाहत आहोत, दुसऱ्या लाटेत अमरावतीला तो पसरला, कारण लग्न कार्ये झाली, गर्दी झाली त्यातून तो पसरला. पण तो ज्या वेगाने पसरला त्याला ट्रेस करणे कठीण आहे, असेही डॉ. सुपे म्हणाले.
(हेही वाचा : रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अनावश्यक वापर! सुरज मांढरेंचे गंभीर निरीक्षण )
काय आहे प्रकरण?
- भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील संशॊधकांचे भारताकडे लक्ष लागले आहे.
- जगभरात पसरलेला हा नवा स्ट्रेन B.1.617 हा भारतातून पसरला आहे, असे जागतिक स्तरावरील संशोधकांचे म्हणणे आहे.
- फेब्रुवारीमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याचा प्रसार झाला, त्यानंतर तो देशभर पसरला असे संशोधकांचे म्हणणे आहे.
- हा स्ट्रेन ब्रिटन, आफ्रिका किंवा ब्राझिलपेक्षा वेगळा आहे का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
- दुसऱ्या लाटेमागे कोरोनाचा डबल म्युटेंट कारणीभूत आहे, हे सांगणे कठीण आहे, असे आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी म्हणाल्या.