Yamuna Expressway: दाट धुक्यामुळे वाहने एकमेकांवर धडकली, विविध ठिकाणी अपघाताच्या घटना

गौतम बुद्ध नगरमधील जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयानतपूर गावाजवळ ही घटना घडली.

170
Yamuna Expressway: दाट धुक्यामुळे वाहने एकमेकांवर धडकली, विविध ठिकाणी अपघाताच्या घटना
Yamuna Expressway: दाट धुक्यामुळे वाहने एकमेकांवर धडकली, विविध ठिकाणी अपघाताच्या घटना

दाट धुक्यामुळे सर्वत्र धुके पसरत आहे. यामुळे रस्त्यावरील व्हिजिबिलिटी कमी होत आहे. परिणामी वाहने एकमेकांवर धडकून अपघाताच्या घटना घडत आहेत.

ग्रेटर नोएडातील यमुना द्रुतगती मार्गावर दाट धुके आणि अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे सुमारे 12 वाहने एकमेकांना धडकली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगरमधील जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयानतपूर गावाजवळ ही घटना घडली.


या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. काहींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुमारे डझनभर वाहनांचे नुकसान झाले आहे, आम्ही रस्ता साफ करत आहोत, द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ही घटना ज्यांनी पाहिली त्यांनी पोलिसांना सांगितले की, एका वाहनाने अचानक ब्रेक लावला आणि त्याच्या मागे असलेल्यांनी एकापाठोपाठ एक धडक दिली. अपघाताच्या ठिकाणाहून नुकसान झालेल्या वाहनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा… 

दिल्लीतील एनसीआरसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातही दाट धुके पसरले आहे. यामुळे रस्त्यांवरील व्हिजिबिलिटी अत्यंत कमी झाली आहे. रेल्वे वाहतुकी आणि विमान वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. रस्त्यावर वाहने चालवताना चालकांना त्रास होत आहे. अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. दाट धुक्यामुळे उन्नावमधील आग्रा लखनऊ एक्सप्रेस-वे आणि पेरीफेरल एक्सप्रेस वे-वर मोठा अपघात घडला. धुक्यामुळे एका पाठोपाठ एक ३ बसेस, १ ट्रक आणि २ कारसह ६ वाहने एकमेकांवर आदळली. ही वाहने लखनऊवरून आग्र्याच्या दिशेने जात होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.