यंदाचा महापरिनिर्वाण दिन होणार सन २०१९ प्रमाणेच

197
मुंबई महानगरपालिकेद्वारे सन २०१९ मध्ये दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात आलेल्या व्यवस्थेच्या व सोयी-सुविधांच्या धर्तीवर यंदाचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु, याबाबत ज्या ठिकाणी गरज असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्‍य समन्‍वय साधून कार्यवाही करण्याचे आणि अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही आयुक्‍तांनी दिले आहेत.
bmc

महापालिकेत बैठक

मुंबई  महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांसोबत यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या व्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित महापरिनिर्वाण दिन समन्वय बैठकीत या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर)  आशीष शर्मा, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक  लोकेश चंद्र, मुंबई पोलिस दलाचे अतिरिक्त आयुक्त  ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्‍त (सुधार)  रमेश पवार, उप आयुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादर, उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य)  संजय कु-हाडे, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे, पोलिस उप आयुक्त  प्रणय अशोक, पोलिस उप आयुक्त (वाहतूक)  राजतिलक रोशन, एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त  महेश पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भंते राहूल बोधी – महाथेरो, सरचिटणीस  नागसेन कांबळे, उपाध्‍यक्ष  महेंद्र साळवे, उपाध्‍यक्ष  रवी गरुड,  श्रीकांत भिसे,  दिलिप थोरवडे आणि मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

सेवा-सुविधांवर चर्चा

सन २०२० व २०२१ या सलग २ वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनी कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियमांचे पालन करुन अनुयायांनी आपले श्रद्धासुमन अर्पित केले होते. या दोन्ही वर्षी महानगरपालिकेने केलेल्या विनंतीला व आवाहनांना अनुयायांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले होते. या सहकार्यास्तव अनुयायांचे व सर्व संबंधितांचे आयुक्तांनी आभार मानले. या बैठकी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त  रमाकांत बिरादार यांनी ६ डिसेंबर २०२२ च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.