Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : महापालिकेचे ‘भीमा तुम्हा वंदना’ द्वारे अभिवादन

178
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : महापालिकेचे ‘भीमा तुम्हा वंदना’ द्वारे अभिवादन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित आणि महानगरपालिका मुद्रणालयाद्वारे मुद्रित ‘भीमा तुम्हा वंदना’ या माहिती पुस्तिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पुरविल्या जाणाऱ्या नागरी सोयी-सुविधांची माहिती देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित, त्यांच्या कार्याचा महिमा वर्णन करणाऱ्या विविध अभिवादनावर गीतांचा समावेश करण्यात आला आहे. प्रख्यात गीतकार वामन कर्डक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, वि. तु. जाधव, शांताराम नांदगावकर, सुरेश भट, लक्ष्मण केदार आदींनी शब्दबद्ध केलेल्या रचनांचे यात संकलन करण्यात आले असून प्रत्येक गीतासोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वाचक ही भीमगीते थेट ऐकू शकणार आहेत. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने यंदा तयार करण्यात आलेल्या ‘भीमा तुम्हा वंदना’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आंबेडकर यांनी महापालिकेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)

(हेही वाचा – शपथविधीनंतर CM Devendra Fadnavis यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर)

ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमीवर (दादर) येत असतात. या अनुयायांना नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य मुंबई महानगरपालिका अत्यंत चोखपणे पार पाडत असते. मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिका प्रशासनाकडून हे कार्य अविरतपणे सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या माहिती पुस्तिकेतून या कार्याची माहिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र सातासमुद्रापार पोहोचत असते. यंदाची माहिती पुस्तिकाही याच कार्याची पावती आहे, असे गौरवोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी गुरुवारी ०५ डिसेंबर २०२४ रोजी काढले. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)

उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी, कुर्ला विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे, भंते साधनानंद, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, प्रतीक कांबळे, भिकाजी कांबळे, प्रकाश जाधव आदी यावेळी उपस्थित होते. ही पुस्तिका अनुयायांना विनामुल्य वितरित केली जाते. पुस्तक प्रकाशनानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी जनसंपर्क विभागातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. तसेच अनुयायांसाठी मार्गदर्शक दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.