Dr. Bhau Daji Lad Museum इंटॅक आणि बजाज फाऊंडेशनच्या ताब्यात, तरीही…

322
Dr. Bhau Daji Lad Museum इंटॅक आणि बजाज फाऊंडेशनच्या ताब्यात, तरीही...
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानातील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) इमारतीच्या जागेचा ताबा जमनालाल बजाज आणि इंटॅक यांच्याकडे असून या वस्तूसंग्रलयात महापालिकेला कोणताही हस्तक्षेप करता येत नसतानाही याच्या दुरुस्तीवर महापालिकेच्यावतीने तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. आता याच नूतनीकरण केलेल्या या संग्रहालयाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

भायखळ्यातील राणीबागेत असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) अर्थात म्युझियमची जागा भाडेकरारावर देण्यात आला. परंतु या करारातील अटींचा भंग करत ही जागेवर पार्टीचे आयोजन, शुटींग तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने मनसेचे तत्कालिन गटनेते संदीप देशपांडे आणि तत्कालिन मनसे नगरसेविका समिता नाईक यांनी याचा करार रद्द करण्याची मागणी केली होती. महापालिका, मेसर्स इंटॅक आणि जमनालाल बजाज फाऊंडेशन यांच्याबरोबरच १५ वर्षांकरता केलेला हा ठराव जानेवारी २०१८ ला संपुष्टात आला. त्यानंतरही त्यांच्यासोबत सामजस्य करार झालेला नसतानाही या म्युझियमची वास्तू जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि इंटॅकच्या ताब्यातच आहे.

(हेही वाचा – HMPV Virus : एचएमपीव्ही विषाणूचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम नाही; तज्ञांचा दिलासा)

परंतु आजतागायत ही वास्तू महापालिकेच्या ताब्यात कायदेशीर आलेली नसून मेसर्स इंटॅक आणि बजाज फाऊंडेशन यांच्याच ताब्यातच आहे. या वस्तूसंग्रहालयाची (Dr. Bhau Daji Lad Museum) इमारत पुरातन वास्तूमध्ये मोडत असून मालाड दगडी बांधकाम असलेल्या या वास्तूचा जिर्णोध्दार सन २००३-०४ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मागील २० वर्षांमध्ये वास्तूची दुरुस्ती न केल्याने महापालिकेच्यावतीने याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी देवांग कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करून याकरता सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे संबंधित संस्थेच्या ताब्यात ही वास्तू असतानाच याच्या नुतनीकरणावर तीन कोटींचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला.

महापालिकेच्या विरोधानंतरही महापालिका आयुक्तांनी २०१९मध्ये संबंधित संस्थेकडे ही जागा कायम ठेवण्यास मंजुरी दिली असलजी तरी याला महापालिका सभागृहाची कोणतीही मंजुरी नसल्याने आयुक्तांच्या तत्वत: मंजुरीला काही बळ नसल्याचे बोलले जात आहे. परंतु आयुक्तांच्या स्तरावर ही संस्थेकडे हे म्युझियम ठेवण्यास मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात ही मुदत किती वर्षांकरता आहे याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. (Dr. Bhau Daji Lad Museum)

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हेलिकॉप्टर तपासणी ते मतदान टक्केवारी; Election Commission ने राजकारण्यांचे कान टोचले)

नुतनीकरणात कोणत्या कामांचा समावेश

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या (Dr. Bhau Daji Lad Museum) वास्तुचे नूतनीकरण अंतर्गत दुरुस्ती, पुनरुज्जीवन व जतनविषयक कामांसाठी मार्च २०२३ मध्ये कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विहित वेळापत्रकानुसार १८ महिन्यांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये इमारतीच्या छतावर जलावरोध कामे, छताची अंतर्गत दुरुस्ती तसेच त्यावरील नक्षीकाम पूर्ववत करणे, आतील व बाह्य गिलावा (प्लास्टर) दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती, जोतेक्षेत्राचे संरक्षण (प्लींथ प्रोटेक्शन), रंगकाम, कठडे, उतरंड (रॅम्प) इत्यादींचा समावेश होता. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.