मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मर्जीतील मानले जाणारे १९८९ च्या तुकडीतील ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी डॉ. चहल यांच्या बदलीचा आदेश जारी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. चहल यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
(हेही वाचा – निवासी डॉक्टरांसाठी 36-48 तासांची शिफ्ट अमानवीय; Supreme Court ने कोलकाता प्रकरणाच्या सुनावणीवेळी व्यक्त केली चिंता)
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असताना सुजाता सौनिक यांची ३० जून २०२४ रोजी राज्याच्या मुख्य सचिव म्हणून वर्णी लागली होती. त्यावेळी राज्य सरकारने (State Govt) गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार सौनिक यांच्याकडेच ठेवला होता. बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेने राज्यात उसळलेली संतापाची लाट, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जाणारा प्रश्न तसेच आगामी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर डॉ. चहल (Iqbal Singh Chahal) यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे.
(हेही वाचा – मविआला दलित मुस्लिमांची मते मिळणार नाहीत; Raj Thackeray असे का म्हणाले?)
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. चहल यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. मुंबई महापालिकेतून डॉ. चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली होती. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. याशिवाय उद्योग, खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील चहल यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community