शेखर चन्ने यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. माधव कुसेकर (Dr. Madhav Kusekar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीआधी कुसेकर हे यवतमाळ जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. (Dr. Madhav Kusekar)
(हेही वाचा – Ministry Clerk Typists : मंत्रालय लिपिक टंकलेखक यांना दरमहा पाच हजारांचा भत्ता)
चन्ने हे ३० नोव्हेंबर २०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर एसटीच्या उपाध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे सोपवला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी कुसेकर यांच्यासह दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची बदली मंत्रालयात वित्त विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. (Dr. Madhav Kusekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community