Dr. Mangala Narlikar : मराठी प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना पत्नी शोक

243
Dr. Mangala Narlikar : मराठी प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर (Dr. Mangala Narlikar) यांचे निधन झाले आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ काळापासून त्या कर्करोगाच्या दुर्धर अजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मधल्या काही काळात त्यांनी आपल्या असाध्य आजारावर वैद्यकीय उपचारांनी मातही केली होती. मात्र, अखेर त्यांना मृत्यूने गाठलं. सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (सोमवार १७ जुलै) दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने एक मराठी गणितज्ज्ञ हरपला आहेच. परंतू, त्यासोबतच एक लेखिका , शिक्षिका, विज्ञाननिष्ठ विचारवंत आणि संशोधकही आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Wimbledon Final 2023 : एका नव्या पर्वाची नांदी)

डॉ. मंगला नारळीकर (Dr. Mangala Narlikar) यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी विवाह केला. तत्पूर्वी त्या मंगला राजवाडे नावाने ओळखल्या जात. १७ मे १९४३ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी १९६२ मध्ये बीएची पदवी संपादन केली. सन १९६४ मध्ये गणित विषयात त्या एम ए झाल्या. विशेष म्हणजे विद्यापीठामध्ये त्या प्रथम आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक मिळाले होते. त्या काळात हा मोठा बहुमान समजला जात होता.

डॉ. मंगला नारळीकर (Dr. Mangala Narlikar) यांची अध्यापकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (मुंबई), केंब्रिज विद्यापीठात , मुंबई आणि पुणे विद्यापीठ (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) आदी नामवंत संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली. १९७४ ते १९८० या काळात त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्स्टिट्युटल येथे संशोधन करुन गणित विषयात पदवी मिळवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.