“उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा!”; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे आवाहन

"ग्रंथोत्सव २०२५" – मराठी वाचनसंस्कृतीला नवे बळ!

26
"उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा!"; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे आवाहन
  • प्रतिनिधी

मराठी साहित्य हे अजरामर करणारे वरदान असून, मुलामुलींमध्ये उमेद आणि धाडस वाढवण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या, वाचनसंस्कृती वाढवा, असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी केले. त्या “ग्रंथोत्सव २०२५” च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथालय, दादर यांच्या वतीने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ५ आणि ६ फेब्रुवारी या दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या हस्ते करण्यात आले.

वाचनसंस्कृतीसाठी नवे पाऊल

मुंबई मराठी ग्रंथालयाने ग्रंथालयीन अभ्यासिका सुरू करून ती जतन केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आभार आणि कौतुक व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नवे लेखक लिखाण करत आहेत, विविध अनुभव मांडले जात आहेत. यातून समाजाला नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी राज्य सरकार बालक साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करणार आहे. यामुळे वाचनसंस्कृती अधिक जोपासली जाईल.”

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : जेव्हा पॅट कमिन्स विराटला म्हणतो, ‘तुला इतकी धिमी फलंदाजी करताना कधी बघितलं नव्हतं’)

सोशल मीडियाला कायद्याच्या चौकटीत आणण्याची गरज

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या प्रभावाबाबतही डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी चिंता व्यक्त केली. “आज काही वेबसाईटमुळे लोक बुद्धी गहाण टाकण्याइतके प्रभावित होत आहेत, आत्महत्येपर्यंत त्यांची मानसिकता जात आहे. त्यामुळे सोशल मीडियाला कायद्याच्या चौकटीत असायला हवे,” असे त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर, समाजात वाढत चाललेला वर्ण, रंग, लिंगभेद आणि दुजाभाव याविषयीही त्यांनी खंत व्यक्त केली. “कुटुंबामध्ये लोकशाही नसल्यानेच ऑनर किलींगसारख्या घटना घडतात,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

पुस्तकांची देवाणघेवाण – एक स्तुत्य उपक्रम

मुंबई मराठी ग्रंथालय, दादर या संस्थेने वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी पुस्तक आदानप्रदान उपक्रम राबवला आहे. यामुळे ३५,००० पुस्तके ग्रंथालयात जमा झाली आणि तीच पुन्हा घरोघरी पोहोचली. हा अभिनव उपक्रम वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यात मोलाची भूमिका बजावत आहे.

मराठी भाषेच्या संरक्षणासाठी सरकार सज्ज – उदय सामंत

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेविरोधातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी सरकार तयारी करत आहे, असे ठामपणे सांगितले. बाळ साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन सुरू करून सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पावले उचलत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर मास्टर्स लीगसाठी करतोय जोरदार सराव)

ग्रंथोत्सवात मान्यवरांची उपस्थिती

या ग्रंथोत्सवासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe), सुप्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत भोजवार, ग्रंथालय संग्रहालय महाराष्ट्र राज्य प्रभारी अशोक गाडेकर, प्रमुख कार्यवाहक रवींद्र गावडे, किरण ढंढोरे उपस्थित होते. यावेळी ग्रंथ दिंडीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

वाचनसंस्कृतीला नवे बळ

“ग्रंथोत्सव २०२५” मधून मराठी वाचनसंस्कृतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उत्तमोत्तम पुस्तके आणि नवे लेखक यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.

वाचन संस्कृती वाढवा, चांगली पुस्तके वाचा – हा संदेश या ग्रंथोत्सवातून देण्यात आला!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.