
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून दिली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी बाबासाहेबांनी या लढ्याला दिलेला पाठिंबा आणि मुंबईच्या मराठी ओळखीचे केलेले सडेतोड समर्थन याचा उल्लेख केला.
(हेही वाचा – Weather Alert : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; उत्तर महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट)
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले की, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी दिल्लीत बाबासाहेबांची भेट घेऊन सहकार्य मागितले तेव्हा त्यांनी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून जिब्राल्टरच्या खडकासारखा पाठिंबा दिला. मुंबईतील राजगृह हे समितीच्या बैठकींचे केंद्र बनले, जिथे प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) उपस्थित असायचे. १९४८ मध्ये बाबासाहेबांनी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणारे निवेदन दिले, ज्यात मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याचे विवेचन आहे. त्यांनी मुंबईची मराठी ओळख नाकारणाऱ्या तर्कांना सडेतोड उत्तर दिले की, परकीय आक्रमणाने मूळ ओळख पुसली जात नाही, तसेच मुंबईची मराठी ओळख कायम आहे.
बाबासाहेबांच्या निधनानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी लढा पुढे नेला. १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आज मराठी भाषा आणि माणसाला दुय्यम दर्जा मिळत असताना, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी समाजाने जातीच्या भिंती तोडून एकत्र येण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन केले. मनसेतर्फे (MNS) बाबासाहेबांना कोटी प्रणाम अर्पण करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community