डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने गुरुवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूरच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) येथून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राचे (आयटीसीएम) चाचणी उड्डाण यशस्वीरित्या केले. हे क्षेपणास्त्र बंगळुरू येथील डीआरडीओ प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एडीई) इतर प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योगांच्या योगदानासह विकसित केले. (DRDO)
चाचणीदरम्यान, सर्व उप-प्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली. उड्डाण मार्गाचे संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी विविध ठिकाणी आयटीआरने तैनात केलेल्या रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम (ईओटीएस) आणि टेलीमेट्रीसारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे निरीक्षण केले गेले. आयएएफच्या एसयू-३०-एमके-१ विमानानेही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवले.
(हेही वाचा – Lok Sabha Election Phase 1: निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू, विधानसभेचा कौल ईव्हीएममध्ये होणार बंद)
संरक्षण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘वेपॉईंट नेव्हिगेशनचा वापर करून क्षेपणास्त्राने इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अतिशय कमी उंचीवर सागरी-स्किमिंग उड्डाण केले. या यशस्वी उड्डाण चाचणीने गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (जीटीआरई) बंगळुरूने विकसित केलेल्या स्वदेशी प्रणोदन प्रणालीची चाचणीही यशस्वीरित्या पार पडली आहे.
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकासात महत्त्वाचा टप्पा
आयटीसीएमच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, स्वदेशी प्रणोदनद्वारे समर्थित स्वदेशी लांब पल्ल्याच्या सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा यशस्वी विकास हा भारतीय संरक्षण संशोधन आणि विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी आयटीसीएमचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल संपूर्ण डीआरडीओ पथकाचे अभिनंदन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community