Temple Dress Code : कुणकेश्वर मंदिरात भाविकांना प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू, देवस्थानाकडून सहकार्य करण्याचे आवाहन

अंगप्रदर्शक, उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स नको 

230
Temple Dress Code : कुणकेश्वर मंदिरात भाविकांना प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू, देवस्थानाकडून सहकार्य करण्याचे आवाहन
Temple Dress Code : कुणकेश्वर मंदिरात भाविकांना प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू, देवस्थानाकडून सहकार्य करण्याचे आवाहन

दक्षिण कोकणची ‘काशी’म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात आला आहे.अंगप्रदर्शक, उत्तेजक वस्त्रे,फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि पावित्र्य राखले जाण्याच्या हेतूने या नियमाची अंमलजावणी करण्यात येणार आहे.

अंगप्रदर्शक आणि उत्तेजक वस्त्रे परिधान करून मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना देवस्थानाकडून शाल,उपरणे, पंचा,ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. भाविक आणि भक्तांना देवस्थानाच्या या निर्णयाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते.याच पार्श्वभूमीवर ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : ठाकरेंची ‘ती’ संकल्पना कागदावरूनही बाद! )

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व…

कुणकेश्वर मंदिर पुरातन पांडवकालीन असून मंदिराची बांधणी हा वास्तूकलेचा एक सुंदर नमुना आहे. येथे 107 शिवलिंगे आहेत, तर काशी येथे 108 शिवलिंगे आहेत, मात्र ही शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे ती फक्त ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. गेली कित्येक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत. सध्या केवळ 5 ते 6 ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत. श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इसवी सन अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरात येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.