Deepak Kesarkar : राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना लागू होणार ड्रेस कोड

शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते त्याच धर्तीवर शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

521
Deepak Kesarkar: दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? दीपक केसरकर यांनी दिले उत्तर

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. तसेच शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते त्याच धर्तीवर शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचेही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. सर्व शाळांमध्ये राज्यगीत वाजविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले. (Deepak Kesarkar)

शिक्षक हा भावी पिढी घडवित असतो. विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असल्याने शिक्षकांनी घातलेल्या पेहरावाचा त्यांच्या मनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे शिक्षकांचा पोशाख हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून असला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असावा. तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी. शर्ट इन असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Deepak Kesarkar)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ)

शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ड्रेस कोड ठरविला पाहिजे. पुरूष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरूष शिक्षकांच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा. पुरूषांना शूज घालावे लागणार आहेत. वैद्यकीय कारण असेल तर बूट घालण्यापासून सूट देण्यात येईल. स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचाच ड्रेस राहील. सर्व शाळांमध्ये राज्यगीत वाजविले जाणार राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना यांच्यासोबतच राज्यगीत देखील वाजविण्यात यावे अशा सूचनाही सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. (Deepak Kesarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.