Accident : मिरवणुकीमुळे चालक झाला विचलित; दोघांना चिरडले

200
Accident: पंढरपूर-कराड रोडवर भीषण अपघात, ६ महिला ठार, १ गंभीर जखमी
विवाह सोहळ्यासाठी मिरवणूक जात असताना मोठ मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. त्याच्या आवाजाने वाहन चालकाचे लक्ष विचलित झाले. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यात दोघांना चिरडले (Accident).
या अपघातात (Accident) सहा जणांना दुखापत झाली. त्यांच्यातील काहींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी, ४ जानेवारी रोजी दुपारी ४.३० सुमारास तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८), भास्कर राधू खताळ (वय ७३) अशी मयतांची नावे आहेत. अभिजीत संतोष ठोंबरे (वय २२), रामनाथ दशरथ काळे (वय ६५), गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान राबवा खताळ, भारत भागा खताळ, सागर शंकर खताळ अशी (सर्व रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) अशी जखमींची नावे आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.