टोलनाका आणि भोंगळ कारभार हे समीकरणच बनले आहे. काही टोल नाक्यावर वाहन चालकांची फसवणूक केली जाते, काही ठिकाणी टोल वसुली होते, पण रस्त्याची देखभाल होत नाही. आता तर FASTag अकाउंटमध्ये पैसे असतात पण गाडी टोल नाक्यावर आल्यावर त्यात पुरेसे पैसे नसल्याचे सांगितले जाते आणि रोख रक्कम वसूल केली जात आहे. ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक केली जात आहे.
(हेही वाचा डोळा मारणे हा विनयभंगच; Mumbai Mazgaon District Megistrate चा महत्वाचा निर्णय; आरोपीला सुनावलेली शिक्षा )
ICIC App बंद
एक वाहनचालकाने सांगितले की, अटल सेतू येथून जात असताना तेथील टोल नाक्यावर त्यांना अडवण्यात आले. त्यांच्या गाडीवर FASTag आहे. त्यामध्ये ३ हजार ६२ रुपये शिल्लक आहेत. मात्र तरीही टोल नाक्यावर त्यांच्या FASTag खात्यात पुरेशी रक्कम नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून रोख रकम घेऊन टोल वसूल करण्यात आला. त्यानंतर पुढील टोल नाक्यावरही त्यांच्याकडून रोख रकमेत टोल वसूल करण्यात आला. यानंतर त्यांनी FASTag रिचार्ज करण्यासाठी ICIC App सुरु केले असता हे App चालू होत नव्हते. जर App बंद असेल तर ग्राहक FASTag रिचार्ज करू शकणार नाही. सगळ्यांकडेच नेट बँकिंग ही सुविधा नसते. त्यामुळे ही ग्राहकांची टोल नाक्यांवर होत असलेली फसवणूकच आहे.
Join Our WhatsApp Community