…तर रद्द होणार तुमचा वाहन परवाना!

वाहतूक नियमांचे पालन करणे सुरक्षेच्या कारणास्तव बंधनकारक असते. पण तरीही अनेक लोक या नियमांचे पालन करत नाहीत. पण इथून पुढे अशा नियमांचे उल्लंघन करणे आणि विना हेल्मेट वाहन चालविणे नागरिकांना चांगलेच महागात पडणार असून, असे केल्यास नव्या कायद्यानुसार तीन महिने वाहन परवाना (लायसन्स) निलंबनाची कारवाई होणार आहे, तर दंडाच्या रकमेतदेखील वाढ करण्यात आली असून, एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

डिसेंबरपासून नवा कायदा

मोटार वाहन कायदा २०१९ मध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती. एक डिसेंबरपासून राज्यात या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट नसल्यास पूर्वी ५०० रुपये दंड आकारला जात होता. यामुळे अनेक वाहनधारक दंड भरून निघून जात होते. परंतु, आता दंडाच्या रकमेत वाढ करीत एक हजार दंड आकारण्यात येणार आहे. तर, तीन महिने वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.

( हेही वाचा : BYJU’S आणि शाहरूख खानला दणका! काय म्हणाले ग्राहक आयोग? )

दंडाच्या रकमेत वाढ

परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी एक हजार रुपये दंड होता. यात आता वाढ करण्यात आली असून पाच हजार रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे. सीटबेल्ट नसल्यास पूर्वी दोनशे रुपये असलेला दंड आता एक हजार रुपये एवढा झाला आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांना एक ते पाच हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांनादेखील या तरतुदीनुसार दंड केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here