इराणी समर्थक हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला केला. हल्ला झालेल्या जहाजावर भारतीय ध्वज असल्याचा दावा करण्यात आला असल्याचे वृत्त अनेक वाहिन्यांनी दिले होते, परंतु या जहाजावर भारतीय ध्वज नसल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गॅबनच्या ध्वज असलेल्या जहाजावर रविवारी, २४ डिसेंबरला सकाळी ड्रोन हल्ला झाला. गॅबन हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. या देशाचा ध्वज असलेले एमव्ही साईबाबा (MV Saibaba) या कच्चे तेल वाहक करणाऱ्या जहाजाला लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी लक्ष्य केले. यामध्ये २५ भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. यापूर्वी शनिवारी हुथी बंडखोरांनी अरबी समुद्रात इस्रायलाच्या एका टँकरला लक्ष्य केल्याचा दावा अमेरिकेने केला होता, अशी माहिती एका नौदल अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
(हेही वााचा –Sanjay Raut यांच्या ट्विटमुळे इस्त्रायल नाराज; थेट पत्र पाठवून मोदी सरकारकडे केली तक्रार! )
आतापर्यंत १५ वेळा हल्ले
हुथी बंडखोरांकडून आतापर्यंत १५ वेळा हल्ले करण्यात आले आहेत. १७ ऑक्टोबरपासून दक्षिणेकडील महासागरात व्यावसायिक शिपिंगवर हल्ला सुरूच आहे. व्यावसायिक जहाजांवरील हा १५ वा हल्ला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडोने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp CommunityHouthi attack: Navy denies US claim, says MV SAIBABA tank not India-flagged; adds all 25 Indian crew members safe
Read @ANI Story | https://t.co/4am3snHO54#HouthiAttack #IndianNavy #MVSAIBABA #RedSea pic.twitter.com/zPiAoZ6LT0
— ANI Digital (@ani_digital) December 24, 2023