मुंबई पोलिसांनी नाशिक एमआयडीसी ( Nashik MIDC area) परिसरातील गोदामात छापा टाकून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका गोदामात साठवून ठेवलेले सुमारे १२ कोटी रुपये किमतीचे ६ किलो मेफेड्रोन (MD)ड्रग्ज रविवारी जप्त केले. ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे १३३ किलो एमडी जप्त केले होते. डीसीपी दत्ता नलावडे यांच्या सूचनेवरून मुंबई पोलिसांनी नाशिकच्या एमआयडीसी भागातील रासायनिक कारखान्यावर छापा टाकला होता.
डीसीपी दत्ता नलावडे यांच्या सूचनेवरून मुंबई पोलिसांनी नाशिकच्या एमआयडीसी भागातील रासायनिक कारखान्यावर छापा टाकून ही कारवाई केली होती. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्याच्या या कारवाईची गंभीर दखल घेत नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या भागातील सर्व रासायनिक प्रक्रिया करणारी युनिट्स आणि गोदामे याची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर डीसीपी (झोन 2) मोनिका राऊत आणि एसीपी आनंदा वाघ यांनी एमआयडीसी क्षेत्रातील सर्व रासायनिक प्रक्रिया युनिट्स आणि गोदामांची तपासणी करण्यासाठी एक सक्रिय मोहीम सुरू केली.
(हेही वाचा – India China Dispute : भारत चीन वाद सोडवण्यासाठी भारताने उचलले ‘हे’ पाऊल)
या मोहिमेवेळी नाशिक रोड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, एपीआय हेमंत फड आणि त्यांच्या पथकाने रविवारी पहाटे शिंदे गावातील दत्तु जाधव यांच्या मालकीच्या गोदामावर छापा घातला. यावेळी केलेल्या तपासणीत ५.८७ किलो एमडी साठा जप्त करण्यात आला. याशिवाय जवळपास १०० ड्रम्स आणि काही कच्चा मालही जप्त करण्यात आल्याची माहिती वांजळे यांनी दिली आहे.
या कारवाईत पोलिसांनी तीन जणांविरुद्ध नार्कोटिक्स, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्याच्या कलम 8A, 22 आणि 8C अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. हे संशयित जागा भाड्याने घेऊन तेथे दारू साठवायचे, अशी माहितीही वांजळे यांनी दिली आहे. “मुंबई पोलिसांनी ज्या सुविधेतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले त्या सुविधेपासून हे ठिकाण केवळ 500 मीटर अंतरावर असल्याने, मुंबई पोलिसांच्या प्रकरणातील प्रमुख संशयित ललित पाटील याचा या प्रकरणातही तपास आहे का, याचाही शोध लावणार असल्याची माहिती वांजळे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community