पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर (Pune Sassoon Hospitals) २ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ललित पटेल (Accused Lalit Patel) आणि इतर २ तरुण या गुन्ह्यात सहभागी त्यांचे हाय प्रोफाईल रॅकेट (High profile racket) असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. ललित पटेलला पोलिसांनी या गुन्ह्याआधीच अटक केली होती, तो येरवडा कारागृहात (Yerwada Jail) शिक्षा भोगत होता. वैद्यकीय उपचारांसाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले . त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातूनच १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्ज (Mephidrone drugs) जप्त केले. जप्त केलेल्या मेफिड्रोन (MD) किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी आहे.
(हेही वाचा – MLA Kunal Patil : काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा)
रुग्णालयात भरती असूनही ललित पटेलने रॅकेट कसे चालवले. याचा पोलीस शोध घेत आहेत. ससून रुग्णालयातील कर्मचारी यामध्ये सहभागी आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community