बापरे! ३ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त! तटरक्षक दलाची कारवाई!

88

भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या कारवाईत ३ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. श्रीलंकेहून अमली पदार्थ घेऊन येणाऱ्या या जहाजावर लक्षद्वीप येथे कारवाई करण्यात आली. याशिवाय ५ एके-४७ रायफल्स आणि १ हजार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.

गुप्तचर विभागाच्या माहितीवरून कारवाई!

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन परदेशातील एक बोट येत असल्याची माहिती १५ मार्च रोजी गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानंतर तात्काळ तटरक्षक दल कार्यरत झाले आणि त्या बोटीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु झाली. ही  माहिती मिळताच तात्काळ तटरक्षक दलाच्या ५ बोटी आणि एअरक्राफ्ट समुद्रात त्या जहाजाच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर पथकाने ३०० कि.ग्रॅम हेरॉईन, ५ एके-४७ रायफल्स, १ हजार जिवंत काडतुसे इत्यादी मुद्देमाल जप्त केला. ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यातून १९ नाविकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, असे तटरक्षक दलाच्या महासंचालकांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : तळ कोकणात राणेंचा दबदबा पुन्हा वाढला, शिवसेनेला लागली ‘घरघर’!)

आतापर्यंत झालेल्या कारवाई!

पश्चिमी समुद्रकिनारी अमली पदार्थ तस्करीवरील हे दुसरी मोठी कारवाई आहे. याआधी ५ मार्च रोजी श्रीलंकेतूनच २०० कि. ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ घेऊन जाणारे जहाज आणि ६ नाविकांना पकडण्यात आले. तर नोव्हेंबर २०२० मध्येही यात समुद्री मार्गावर १२० कि. ग्रॅम अमली पदार्थ पकडण्यात आले. ज्यांची किंमत १ हजार कोटी रुपये इतकी होती आणि ५ शस्त्र जप्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.