भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चारचाकी चालकाने जोरदार धडक दिली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) थोडक्यात बचावले आहेत.
(हेही वाचा – Mumbai Ganesh Visarjan 2024 : रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती; सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता)
पुण्यामध्ये रात्री भाजप (BJP) नेते यांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी १६ सप्टेंबर रोजी पुण्यात होते. या वेळी रात्री प्रवासात एका मद्यपी वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक दिली आहे. यात गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने चंद्रकांत पाटील यातून बचावले आहेत.
महायुतीचे सरकार यावे, हे बाप्पाला मागितले – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या वेळी म्हणाले, ”गेल्या ११ दिवसांत मी सहाशे गणपतींचे दर्शन घेतले. उत्तमपणे गणेशोत्सव साजरा झाला आहे. महायुतीचे सरकार यावे, हे बाप्पाला मागितले आहे. लोकसभेत पिछेहाट झाली म्हणतात, पण असे काही झाले नाही. लोकसभेत ज्या १३० जागा विधानसभेत आम्ही पुढे होतो त्या आता १७० वर जातील. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले, बाकी कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांना ते देता आले नाही. मराठा आरक्षण संदर्भात तथ्य सोडून कोणी ही बोलू नये. फडणवीस यांनी आरक्षण दिलं, उद्धव जी यांनी घालवलं, परत एकनाथ शिंदे यांनी दिलं.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community