मेळघाटात एक काळ असा होता की, गावागावात पाण्याची कुठलीही समस्या नव्हती. इथली पाण्याची पातळीही वाढली होती, पण नद्यांमधून अवैध वाळू उत्खनन आणि जमिनीत जागोजागी बोअरवेल केल्याने येथील पाण्याची पातळी पूर्णपणे खाली गेली आहे. मेळघाटची वाटचाल आता पाण्याच्या समस्येमुळे कोरडवाहू क्षेत्राकडे होताना दिसत आहे.
पाणीपुरवठ्याचे पंप हाऊस भंगारात जमा
येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गेल्या 30 वर्षात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने अनेक नावे बदलून अनेक प्रकारच्या योजना गावामध्ये राबवल्या आहेत. मात्र, सर्व काही असूनही नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही वर्षांपूर्वी मेळघाटातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेंतर्गत मोठमोठ्या विहिरी बांधण्यात आल्या. पंपहाऊसही बांधण्यात आले होते. मेळघाटातील रायझिंग मेनमध्ये वाढ करून विहीर गावापासून दोन ते तिन किलोमीटर दूर खोदण्यात आल्या होत्या. येथे बांधण्यात आलेल्या विहिरी व पाणीपुरवठ्यासाठी पंप हाऊस भंगाराचे रूप धारण करताना दिसत आहेत. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर विहिरी बांधण्यात आल्या होत्या. जो आज तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे.
( हेही वाचा: आता सगळे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही; गुगल, अॅपल आणि मायक्रोसाॅफ्ट कंपनीची मोठी घोषणा )
सरकार काय करणार याकडे नागरिकांचे लक्ष
यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसत सर्वच नद्या कोरड्या पडल्याने, मेळघाट आता बिकट अवस्थेत उभा असलेला दिसत आहे. आता या ग्रामस्थांना पाणी समस्येतून शासन कसे बाहेर काढते? याकडे मेळघाटातील तमाम नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर दोन दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. आता मेळघाटात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नाकडे पालकमंत्री कसे पाहणार? याकडे मेळघाटातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community