श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

या काळात मंदिरात 'श्रीं'ची विधीवत पूजाअर्चा नियमित होतील, असे न्यास व्यवस्थापन समितीने कळवले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ४ एप्रिल २०२१ रोजी लावलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी ५ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून मुंबईतील प्रसिद्ध मंदीर श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर दर्शनाकरिता भाविकांसाठी बंद करण्याची निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. मंदिर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

शासनाच्या कडक निर्बंधामुळे घेतला निर्णय!

या काळात मंदिरात ‘श्रीं’ची विधीवत पूजाअर्चा नियमित होतील, असे न्यास व्यवस्थापन समितीने कळवले आहे. या कालावधीत फक्त ऑनलाईन पूजा चालू राहतील. तसेच क्युआर कोडमार्फत देण्यात येणारे दर्शन पूर्णतः बंद करण्यात आले आहे. शासनाच्या कडक निर्बंधामुळे राज्यभरातील सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीने हा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : मुंबईत सुमारे ६२ हजार बाधित रुग्ण, पण गंभीर रुग्ण १ हजार!)

पुजा आणि आरतीच्या वेळा खालीलप्रमाणे असतील!

बुधवार ते सोमवार
सकाळी ५.३० ते ६.००
सायंकाळी ७.३० ते ८.००

मंगळवार
सकाळी ५.०० ते सकाळी ५.३०
रात्रौ ९.४५ ते रात्रौ १०.००

संकष्टी चतुर्थी
चंद्रोदयानुसार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here