यंदाचीही हज यात्रा रद्द!

सौदी अरेबिया केवळ १ हजार ४४२ स्थानिकांंना हज यात्रेसाठी परवानगी देणार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आता हजसाठी आणखी एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोरोना या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाचा संसर्ग आणि प्रभाव तितका कमी झालेला नाही. त्यामुळे सौदी सरकारने खबरदारीचा इशारा म्हणून या वर्षीची हज यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी सरकारने हज यात्रेविषयी कालपर्यंत अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे जगभरातील मुस्लिमांमध्ये संभ्रम होता. मध्यल्या काळात सौदी सरकारने यंदाच्या वर्षी हज यात्रेसाठी यायचे असेल तर मुस्लिमांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोज घेणे अनिवार्य असेल. त्याच मुस्लिमांना हज यात्रेला परवानगी दिली जाणार आहे, असे सौदी सरकारने म्हटले होते, मात्र आता सौदी सरकारने स्वतः कोरोना महामारीमुळे ही यात्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर रद्द करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. केवळ स्थानिकांनाच तेही मर्यादित संख्येने मक्केमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे म्हटले आहे.

(हेही वाचा : अयोध्येच्या जमिनीचा ‘तो’ करार १० मिनिटांतील नव्हे, तर १० वर्षांपूर्वीचा! )

यंदा केवळ १,४४२ जणांना परवानगी!  

सौदी सरकारच्या निर्णयामुळे हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१ चे सर्व अर्ज रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण हज यात्रेवर जाऊ शकणार नाहीत. सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने कोरोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया केवळ १ हजार ४४२ स्थानिक लोकांना हज करण्यास परवानगी देणार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आता हजसाठी आणखी एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here