देशभरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्र सरकारने इयत्ता १० आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे त्या पाठोपाठ सीबीएसई बोर्डाने इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता आयसीएसई या आणखी एका केंद्रीय बोर्डाने इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ICSE cancels class 10 board examinations, in the wake of #COVID19 situation. The status of exams for class 12 remains the same as the previous order – Class 12 Exam (offline) will be conducted at a later date. pic.twitter.com/59yD583ShL
— ANI (@ANI) April 20, 2021
१२वीची परीक्षा होणार!
काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे आयसीएसई बोर्डाकडून कळवण्यात आले. सीबीएसई विद्यार्थ्यांची देशातील एकूण संख्या 19 लाख आहे. तर, एकट्या महाराष्ट्रातील एसएससीची विद्यार्थी संख्या 16 लाख आहे. याशिवाय बारावीची विद्यार्थी संख्या देखील वेगळी आहे. त्यामुळे परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करणे महाराष्ट्रासाठी अशक्य आहे, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
(हेही वाचा : रुग्ण आकडा घसरतो, पण मृत्यूचा आकडा वाढतोय!)
‘या’ राज्यांमध्येही परीक्षा स्थगित!
तेलंगणा सरकारने कोविड -19 प्रकरणातील वाढ पाहता इंटरमीडिएट प्रथम वर्ष (इयत्ता ११ वी) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रमोट करण्याचा आणि दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सध्याची साथीची परिस्थिती आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारी पाहता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), मध्य प्रदेश बोर्ड, राजस्थान बोर्ड, हिमाचल प्रदेश बोर्ड आणि महाराष्ट्र मंडळानेही परीक्षा स्थगित केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community