सातत्याने होणा-या इंधन दरवाढीचा फटका आता बेस्टलाही बसला आहे. बेस्टला दरमहा अडीच कोटींचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टवर हा अधिकचा भार पडल्याने सरकार चिंतेत आहे. गेल्या सात दिवसांत इंधनाच्या दरात सहावेळा वाढ झाली आहे. सोमवारी ३५ पैशांनी डिझेल महागल्याने मुंबईत डिझेलचा दर ९९ रुपयांच्या पुढे गेला.
बेस्टवर वाढला अतिरिक्त बोजा
सध्या बेस्टच्या ताफ्यात 3 हजार ५४७ बसगाडय़ा असून यात सीएनजीवर धावणाऱ्या १ हजार ५८४ विजेवर धावणाऱ्या सहा आणि डिझेलवरच धावणाऱ्या २९३ स्वमालकीच्या बसगाडय़ा आहेत. तर १ हजार ६६४ बसगाडय़ा भाडेतत्त्वावरील आहेत. सध्या बेस्टला प्रत्येक महिन्याला १ हजार २०० लिटर डिझेल लागते. त्यासाठी १२ कोटी रुपये खर्च येतो. मात्र इंधन दरवाढीमुळे बेस्टवर अतिरिक्त बोजा वाढला असून, महिन्याला अडीच कोटी रुपयांपर्यंत भार सोसावा लागणार आहे.
( हेही वाचा: अद्यापही एसटी सेवा विस्कळीत! पुन्हा संपकरी कर्मचा-यांवर उभारला जाणार कारवाईचा बडगा )
विजेवर धावणा-या बेस्ट दाखल
इंधन दरवाढ, तसेच दैनंदिन खर्च कमी करणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या विजेवर धावणाऱ्या स्वमालकीच्या सहा बस आणि भाडेतत्त्वावरील ३८० बस ताफ्यात आहेत.
Join Our WhatsApp Community