ठाण्यातही कोसळली दरड! ५ जणांचा मृत्यू!

कळवा पूर्व  येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले.

66

मागील २ दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे रविवारी, १८ जुलै रोजी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळल्याने २५ जणांचा तर  वाशी येथे भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनांचे सत्र सोमवारी, १९ जुलै रोजीही सुरूच होते. ठाणे येथे दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्य तात्काळ सुरु!

सोमवारीही मुंबईसह आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाने जोरदार धुमशान घातले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व, घोळाई नगर इथे डोंगर परिसरात दुर्गा चाळीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व  येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे इथे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

(हेही वाचा : कसारा घाटात कोसळली दरड !)

मृतांची नावे 

प्रभू यादव (पु.) वय – ४५, विधावतीदेवी प्रभू यादव (स्त्री) वय  – ४०, रवीकिशन यादव  (पु.) वय – १२, सिमरन यादव (स्त्री) वय – १० आणि संध्या यादव (स्त्री) वय  – ०३

जखमींची नावे 

प्रीती यादव (स्त्री) वय – ०५ आणि अचल यादव (पु.) वय – १८

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.