एसी लोकलच्या तिकीट दरांत 50 टक्के कपात केल्यामुळे एसी लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा वाढता प्रतिसाद बघता मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. मात्र या एसी लोकलच्या या वाढलेल्या संख्येचा सामान्य लोकलच्या फे-यांवर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
(हेही वाचाः चेक बाऊन्सच्या खटल्यांसाठी आता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
40 मिनिटे बघावी लागते वाट
एसी लोकलच्या फे-या वाढल्यामुळे पश्चिम रेल्वेसाठी नवे वेळापत्रक तयार करण्यातल आले आहे. या नव्या वेळापत्रकामुळे रात्रीच्या वेळी चर्चगेटहून विरारला जाणा-या लोकलसाठी सर्वसामांन्यांना वाट पहावी लागत आहे. रात्री 10.56 नंतर चर्चगेटहून विरारला जाणा-या लोकलसाठी प्रवाशांना 40 मिनिटे प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सामान्य लोकलचे आधीचेच वेळापत्रक लागू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
एसी लोकलसाठी धीमी लोकल रद्द
पश्चिम रेल्वेवर पूर्वी 20 एसी लोकल फे-या चालवल्या जात होत्या, पण 16 मे पासून एसी लोकलच्या आणखी 20 फे-यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. चर्चगेटहून 10.56 वाजता चर्चगेट ते विरार जलद लोकल आहे. त्यानंतर 11.23 आणि 11.37 वाजता चर्चगेट ते विरार धीम्या लोकल होत्या. त्यातील 11.23 ची लोकल रद्द करुन त्याजागी एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता 10.56 नंतर प्रवाशांना थेट 11.37 ची लोकल पकडावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा तब्बल 40 मिनिटे खोळंबा होत आहे.
(हेही वाचाः सोसायटींमधील वादांच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्तांची घोषणा)
त्यातच या 40 मिनिटांच्या काळात 4 ते 5 भाईंदर लोकल सोडण्यात येत आहेत. त्यामुळे या भाईंदर लोकलपैकी एखादी विरार लोकल सोडण्यात यावी, जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community