Water Shortage : मुंबईकरांनो, येत्या १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात

274
Water Shortage : मुंबईकरांनो, येत्या १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात
Water Shortage : मुंबईकरांनो, येत्या १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात

यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्‍याबाबतचे अनुमान वर्तवण्‍यात आलेले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार १ जुलै २०२३ पासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यातही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान ही पाणीकपात सप्टेंबर महिन्यांतच किंवा जलसाठ्यात ७५ टक्के वाढ झाल्यानंतर मागे घेतली जाऊ शकते,असे बोलले जात आहे. संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त ९९ हजार १६४ दशलक्ष लिटर म्हणजे ६.८५ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

(हेही वाचा – शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी; विविध श्रेणीत राज्याला ५ पुरस्कार)

दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, मुंबईत १ जुलै २०२३ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्येही १० टक्के कपात लागू राहणार आहे. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.