कॅडबरी उत्पादनांच्या सेवनामुळे लिस्टेरीय व्हायरस पसरत असल्याने युके मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यूकेच्या फूड स्टँडर्ड असोसिएशनने या कॅडबरी उत्पादनांबाबत एक अलर्ट जारी केला आहे आणि त्याचे सेवन न करण्याचा इशारा दिला आहे. या कॅडबरीची उत्पादने भारतीय बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात विकली जातात. विशेषत: देशातील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह लहान मुलांसाठी ही धोक्याची बाब असल्याने कॅडबरी ब्रँडेड डेझर्ट प्रॉडक्टच्या नमुन्यांची चाचणी घेण्याची करून घेण्याची मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनने राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी अन्न व औषध प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात,यूकेच्या फूड स्टँडर्ड असोसिएशनने या कॅडबरी उत्पादनांबाबत एक अलर्ट जारी केला आहे आणि त्याचे सेवन न करण्याचा इशारा दिला आहे, विशेषत: गरोदर महिला आणि ६५ वर्षांवरील नागरिक या सारख्या कमकुवत आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.लिस्टेरिया विषाणूमुळे मानवी शरीरात फ्लू सारखी लक्षणे आढळतात जसे – उच्च ताप, खोकला, सर्दी, स्नायू दुखणे आणि मेंदुज्वर, ज्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या भागात जळजळ होते.
(हेही वाचा BMC : संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनातील 3D मेश शो खर्च वाढला; २५ लाखांवरून थेट पोहोचला साडेसहा कोटींवर)
आम्हाला विविध वृत्तपत्रांमधून या बातम्यांबद्दल कळले आहे की, कॅडबरी ब्रॅण्डे नावाचे क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स या व्हायरसमुळे परत मागवण्यात आले आहेत. ही कॅडबरी उत्पादने भारतीय बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात विकली जातात, त्यामुळे ही भारतीय लोकसंख्येचा विचार करता आणि विशेषतः लहान मुलांचा विचार करता खुप वाईट आहे. त्यामुळे लिस्टेरिया व्हायरसची ओळख पटवणे आणि त्यानुसार आवश्यक कार्यवाही करणे आवश्यक असल्याने कॅडबरी ब्रँडेड डेझर्ट प्रॉडक्टच्या नमुन्यांची चाचणी करून घेण्याची प्रामाणिक विनंती आहे,असे या अन्न व औषध प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community