कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या कडक टाळेबंदीचा मोठा फटका यंदा छत्री व्यवसायाला बसणार आहे. छत्रीसाठी लागणारा कच्चा माल, तयार सांगाडे आणि कापड यांची चीनमधून होणारी आयात जवळपास बंद असल्याने, छत्री उत्पादक आणि विक्रेते अडचणीत आले आहेत. यंदा छत्र्यांच्या निर्मितीत घट होण्याची शक्यता असून छत्र्यांचे दरही 40 ते 50 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
छत्री व्यवसायाला फटका
चीनमधील अनेक शहरांमध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या नव्या आवताराचा उद्रेक झाला. अनेक शहरांमध्ये चीन सरकारने टाळेबंदी केली. त्याचाच फटका भारतात येणा-या अनेक वस्तूंबरोबर छत्री व्यवसायालाही बसला आहे. मागच्या दोन महिन्यांत छत्रीसाठी लागणारा माल चीनमधून येणे आवश्यक होते, पण त्याकाळात चीनमधील शहरे टाळेबंदीत होती त्यामुळे हा कच्चा माल भारतात येऊ शकला नाही.
( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )
छत्र्यांचे दर
यापूर्वी मोठी छत्री 100 ते 110 रुपयांना विकली जात होती. आता ती छत्री यावेळी 140 ते 160 रुपयांना विकली जात आहे. महिलांसाठी दुमडून ठेवता येणारी 90 रुपयांची छत्री यावेळी 125 ते 135 रुपये आहे. बांबूचा दांडा असलेल्या छत्र्यांना ग्राहक अधिक पसंती देतात. ही छत्री 170 रुपयांना विकली जात आहे.
Join Our WhatsApp Community