लॉकडाऊनमुळे उपनगरीय रेल्वेला १ हजार कोटींचे नुकसान!

मध्य रेल्वेला ६०० कोटी, तर पश्चिम रेल्वेला ६७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

95

मागील वर्षांपासून राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील वर्षापासून तब्बल ११ महिने उपनगरीय रेल्वे बंद होती. त्याचा फटका थेट रेल्वेला बसला. या लॉकडाऊन काळातील २०२० वर्षात उपनगरीय रेल्वेला १ हजार २७४ कोटींचा फटका बसला आहे.

३,१४१ लोकल गाड्या यार्डात होत्या!

उपनगरीय रेल्वेतून दररोज मुंबई आणि महामुंबई भागातून ८ लाख प्रवासी ये-जा करतात. भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबई शहरासाठी लोकल सेवा ही लाईफलाईन समजतात. लॉकडाऊन काळात मुंबईतील ३ हजार १४१ लोकल गाड्या २२ मार्च २०२० पासून यार्डात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून उपनगरीय रेल्वेला आर्थिक नुकसान झाले.

(हेही वाचा : 50 वर्षांवरील पोलिसांसाठी कामाच्या नवीन वेळा… मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय)

म.रे.ला ६०० कोटी, तर प.रे.ला ६७४ कोटी नुकसान  

आधीच उपनगरीय रेल्वे सेवा ही कमी प्रवास दर आकारला जातो, म्हणून लोकल सेवा नुकसानीत आहे, त्यात लॉकडाऊनमध्ये सेवा पूर्णतः बंद केल्याने हे नुकसान आणखी वाढले. यात मध्य रेल्वेला ६०० कोटी तर पश्चिम रेल्वेला ६७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. २०२०-२०२१ दरम्यान हे नुकसान झाले. १५ जून २०२० पासून लोकलसेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु करण्यात आली होती. मात्र यासाठी फारच तुरळक लोकल सुरु करण्यात आल्या होत्या.

१५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा लोकल बंद!

१ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्राने लोकल सेवा पूर्ववत केली होती. सर्वसाधारण नागरिकांना लोकल सेवा ठरवून दिलेल्या वेळेनुसार चालू करण्यात आली. सकाळच्या पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ वाजल्यानंतर शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसाधारण नागरिकांना लोकल प्रवासासाठी परवानगी होती. मात्र पुन्हा १५ एप्रिल २०२१ पासून सर्वसाधारण नागरिकांसाठी लोकल प्रवास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षीही उपनगरीय रेल्वेला नुकसान होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.