मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवार २७ जून रोजी सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे उशिराने धावत आहे. वडाळा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने याचा परिणाम हार्बर मार्गावरील लोकलवरती झाला. वडाळा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
(हेही वाचा – Khalistani : तिरंग्याचा अपमान करणार्या खलिस्तानी समर्थकाला भारतीय पत्रकाराचा दणका)
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. ही यंत्रणा पूर्ण दुरुस्त होईपर्यंत सीएसएमटी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
अशातच काल म्हणजेच सोमवार २६ जून रोजी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळेच रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचा आजचा सलग दुसरा दिवस आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community